ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥ बाळा तू माझ्या जवळ नसलास तरी तू असल्याचा भास मला होत राहील. तुझ्या स्वप्नपूर्तीत मी रंगून जाईल. तुझ्या आठवणी शब्दात कैद होणार नाही, त्यासाठी हे कागदाचं आभाळ कमी पडेल. अतिप्रिय निरागस रूप तुझे , तुझं असणं तुलाच पेलवत राहील . मी अशा सोडणार नाही. तू नाही असे मी म्हणणार नाही , एका बाळाच्या जागी मी सहस्र नितेश उभे करील. तू दिलेल्या संघर्षशील शिकवणीतून मी अधिक खंबीर बनेन. तुझ्या प्रेरणेने सदैव तेवत राहील, जन्म आणि मृत्यू कधी नसतोच रे! तू आहेसच अजून अवती भोवती. तुझ्या उमेदीने सागराला गवसणी घालीन . पाना-फुलांमध्ये तुझे गोंडस रूप उभे राहील. आज्जी बाबांचा प्राणसखा तू, त्यांची सदैव सेवा करील. तू तर राजहंस रे, तुला काय लिहावे. तू काढलेल्या छत्रपतींच्या छबीने मला सदैव लढण्याचे बाळ मिळेल. माझा प्रत्येक स्वास तुला निरंतर हुंगत राहील. जा बाळा शांत हो| मोकळा हो| निरंतर तेवत राहा| - तुझी आई